
Satkar: प्रशांत पाटील यांच्या कार्याचा नगरसेवकांकडून सन्मान
Satkar: नगर -मानवी जीवनात संघर्ष नसेल, आव्हाने नसेल तर माणूस एकाअर्थी पोकळच राहतो. आयुष्यात संघर्ष नकोसा वाटत असला तरी त्याचे महत्व मोठे आहे. हे समाजसेवेचे व्रत म्हणून सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख प्रशांत पाटील यांनी करुन दिली. सर्वांना आपलेस करणारे हे प्रभावी व्यक्तीमत्व प्रशांत पाटील ओळखले जातात, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.
पाईपलाईन रोडवरील शिवतेज तरुण मंडळाचे अध्यक्ष व युवकांचे प्रेरणास्थान प्रशांत पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव व वाढदिवसानिमित्त प्रभाग दोनच्या नगरसेवकांकडून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, योगेश पिंपळे, तिरमलेश पासकंठी, मुकुंद लखापती, किरण जगधने, गणेश बाचल, किरण शिंदे, गणेश भारताल आदि उपस्थित होते.
श्री.त्र्यंबके म्हणाले,शिवतेज मंडळाच्या माध्यमातून तरुणाचे संघटन केले. आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची सेवा केली. विविध प्रश्नांवर संघर्ष करीत अन्यायाला विरोध केला. अशा या कार्यकत्याचा सन्मान करणे आम्ही सर्व नगरसेवक कर्तव्य समजतो.
श्री.वारे यांनी प्रशांत पाटील यांच्या कार्याला अजून प्रेरणा मिळावी, म्हणून हा सन्मान करीत आहोत. त्यामुळे त्यांना पाठबळ मिळेल. त्यांच्या हातून सर्वसामान्य लोकांची सेवा घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
श्री.पवार म्हणाले, प्रशांत यांच्या समाज कार्यात सातत्य असते कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करीत राहणे. प्रयत्न, जिद्द, इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या कामातून स्वत:ला ते सिद्ध करतात. हा गुण त्यांच्या कार्यकर्त्यांना भावतो, असे सांगितले.