
पै.गणेश लांडगे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल पर्जन्येश्वर मित्र मंडळाच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आपल्या अंगी असलेल्या शारीरिक व बौद्धिक नेपुण्याच्या जोरावर हमखास यश मिळवता येते. पै.गणेश जितेंद्र लांगडे यांनी पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड व्हावी, यासाठी अनेक प्रयत्न केले. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि ज्युदो खेळाच्या माध्यमातून यश त्यांनी मिळविले. त्याचे हे यश आज अनेक तरुणांना प्रेरणा देणार आहे, असे प्रतिपादन पै.शुभम दातरंगे यांनी केले.
पै.गणेश जितेंद्र लांडगे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल पर्जन्येश्वर मित्र मंडळ व दातरंगे परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पै.शुभम दातरंगे बोलत होते. याप्रसंगी अनिल दातरंगे, गुलाब दातरंगे, प्रा.संजय धोपावकर, दीपक सुडके, अशोक दातरंगे, अविनाश दातरंगे ,अक्षय दातरंगे, दत्ता दातरंगे, स्वप्नील दातरंगे, आनंद दातरंगे. आकाश दातरंगे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पै.दातरंगे म्हणाले कि, पै.गणेश लांडगे यांना हे यश क्रिडा खेळांच्या माध्यमातून मिळवले आहे. त्यांनी ज्युदो खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धा जिंकून विविध पदके त्यांनी मिळवले आहे. ते यंग मेन्स ज्युदो क्लबचा राष्ट्रीय खेळाडू आहे. ज्युदो खेळत त्यांनी स्पर्धा परिक्षा प्रयत्न सुरु केले, त्यांना यश मिळाले. खेळाच्या माध्यमातून त्यांना हे यश मिळविण्यासाठी त्यांना मोठी मदत मिळाली आणि पोलिस उपनिरिक्षकपदी त्यांची निवड झाली. असे ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना पै.गणेश लांडगे म्हणाले कि, माझ्या आई वडिलांचे स्वप्न मी साकार करू शकलो, याचा मला आनंद आहे. माझ्या या यशामध्ये माझ्या मेहनतीचा जेवढा वाटा आहे तेवढाच वाटा माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या असलेल्या माझ्या वडिलांचा, माझ्या कुटुंबाचा आहे. आजच्या या सत्काराने माझी जबाबदारी वाढली आहे आणि आपल्या सर्वांच्या अपेक्षांवर पूर्णपणे खरं उतरण्याचा माझा कायम प्रयत्न राहील, असे आपल्या सत्काराला उत्तर देतांना म्हणाले.
यावेळी पर्जन्यश्वेर मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.