
Savedi: शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रा.विशाल शितोळे यांचे आयुक्तांना निवेदन
Savedi: अहमदनगर (प्रतिनिधी): सावेडी, प्रोफेसर कॉलनी परिसरातील लक्ष्मीमाता मंदिर चौक ते गुलमोहोर रोड पर्यंत बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रीक पोलवर नवीन वीजदिवे बसविण्यात यावे, या मागणी मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रा.विशाल शितोळे यांनी मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना देण्यात आले. युवा सेनेचे उपशहरप्रमुख मयुर गायकवाड उपस्थित होते.
मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावेडी प्रोफेसर चौकातील लक्ष्मीमाता मंदिर चौक ते गुलमोहोर रोड पर्यंत दोन महिन्यापूर्वी खांब बसविण्यात आले आहेत, परंतु अद्याप या इलेक्ट्रीक पोलवर नवीन विजदिवे (पथदिवे) बसविण्यात आलेले नाहीत. या रोड वर्दळीचा असल्याने नेहमीच रहदारी असते.
तसेच या रस्त्यावर दुभाजकही नसल्याने व रात्री स्ट्रीट लाईट नसल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत आपण दि.24 मे 2023 रोजी निवेदन दिले होते. परंतु त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
तसेच लक्ष्मी माता मंदिर चौक येथे खांब रोवण्यासाठी खड्डा खोदला होता, तो देान महिने झाले तरी बुजाविलेला नाही. त्यात पडून एखाद्याचा जीव जाऊ शकतो किंवा कायमचे अपंगत्व येऊ शकते, यास जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित करुन अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.