Monday, October 2, 2023
HomeAHMEDNAGARSavitri Phule Urdu School: पहिल्याच दिवशी पुस्तक मिळाल्याने मुलांमध्ये शिक्षणाची गोडी...

Savitri Phule Urdu School: पहिल्याच दिवशी पुस्तक मिळाल्याने मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होते- प्रा.डाॅ.सलाम सर

Savitri Phule Urdu School: पहिल्याच दिवशी पुस्तक मिळाल्याने मुलांमध्ये  शिक्षणाची गोडी निर्माण होते- प्रा.डाॅ.सलाम सर

Savitri Phule Urdu School: सावित्रीबाई फुले उर्दू शाळेत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

Savitri Phule Urdu School: अहमदनगर (प्रतिनिधी) – प्राथमिक शिक्षण हा जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. हा प्राथमिकचा पाया पक्का झाला तर पुढील शिक्षण हे सोपे जात असते. त्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनी प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या आपल्या पाल्यांवर विशेष लक्ष देऊन शिक्षणाचा पाया पक्का करावा. या टप्प्यातील शिक्षण हेच भविष्यातील यशाचे गमक आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना समजून घेऊन चांगले शिक्षण देणे महत्वाचे आहे. शासनाच्यावतीने देण्यात येणार्या पुस्तके पहिल्याच दिवशी मिळत असल्याने मुलांमध्येही पुस्तकाबद्दल आकर्षण निर्माण होऊन शिक्षणाची गोडी लागण्यास मदत होते, असे प्रतिपादन मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीत चे संस्थापक व प्रमुख कार्यवाहक प्रा.डाॅ.अब्दुस सलाम सर यांनी केले.

मुकुंदनगर येथील मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलित सावित्रीबाई उर्दू प्राथमिक कन्या शाळेत पहिल्याच दिवशी मुलांना मोफत पाठ्यपुस्तके व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगसंस्थेचे प्रा.डाॅ. सलाम सर, मुख्याध्यापक सय्यद नौशाद, शिक्षक शेख फरजाना दिल,अस्लम पटेलसर,शेख शाहिन,शेख हिना, शेख मुमताज, शेख यास्मीन व शेख सुलताना आदिंसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्याध्यापक सय्यद नौशाद यांनी शाळेच्यावतीने वर्षभर राबविण्यात येणारया उपक्रमांची माहिती देऊन सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments