
School: इमारत बांधकामासाठी निधी जमवण्याची उमेद वाढली
अहमदनगर (प्रतिनिधी) -पिंपळगाव रोठा ता पारनेर येथील जय मल्हार विद्यालय या माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम चालू आहे. स्वयंप्रेरणेने रुपये २५५५१/ देणगी उद्योजक गणपत वाफारे आणि शिक्षिका कांचन वाफारे यांनी ऑनलाईन जय मल्हार शिक्षण प्रसारक संस्था पिंपळगाव रोठा यांना पाठवली आहे. वाफारे कुटुंबाच्या या स्वयंस्पिर्ति देणगीने विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी व संस्थेची नवीन इमारत बांधकामासाठी निधी जमवण्याची उमेद वाढली आहे असे प्रतिपादन संस्थेचे सचिव ऍड पांडुरंग गायकवाड यांनी केले आहे.
सानपाडा नवी मुंबई येथे सौ कांचन वाफारे व श्री गणपत वाफारे( रा कर्जुले हर्या, ता. पारनेर) कुटुंबीयांच्या सत्कार प्रसंगी .गायकवाड बोलत होते. याप्रसंगी उद्धव वाफारे, मुख्याध्यापक उत्तम सुंबरे सहशिक्षक जरांगे एन.बी, गरकळ बी.एस. तसेच उपसरपंच महादेव पुंडे, दिलीप घुले, उद्योजक योगेश पुंडे उपस्थित होते. इमारत बांधकामाचा अंदाजे खर्च १ कोटी २५ लाख रुपये आहे.
विद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा संकल्प शाळेचे शिक्षक, कर्मचारी, माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी, ग्रामस्थ सर्वांनी मिळून विद्यालयाच्या रौप्य महोत्सव सोहळ्यात दि.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी केला होता. त्यानुसार शिक्षक,कर्मचारी यांनी पहिल्या टप्प्यात रुपये साडे सात लाख निधी स्वतःचे वेतनातून दिला आहे. सन १९९६ पासूनचे शाळेतील माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व देणगीदार देणगी रूपाने मदत करीत आहेत.
त्यासाठी सुट्टीच्या दिवशी शिक्षक,कर्मचारी समक्ष जाऊन माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी,ग्रामस्थ यांना भेटत आहेत. त्या माध्यमातून देणगी जमा होत असून वाफारे कुटुंबाने स्वतःनिर्णय करून संस्थेचे अकाउंटला रुपये २५५५१/ देणगी ऑनलाईन ट्रान्सफर केल्याने शाळेचे शिक्षक,कर्मचारी,ग्रामस्थ यांची निधी संकलनाची उमेद वाढली आहे असे गायकवाड म्हणाले. संस्थेला देणगी आयकर कलम 80G खाली कर सवलत प्राप्त आहे.
संस्थेचे सेंट्रल बँक ऑफ इंडिया,कान्हूर पठार खाते नंबर 5414747333, IFSC Code CBIN0281860 वर देणगीदारांनी ऑनलाइन देणगी देणेस निवेदन आहे. अधिक माहितीसाठी सचिव ऍड .पांडुरंग गायकवाड मो.9822620142 वर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे