Monday, September 25, 2023
HomeAHMEDNAGARSevapurti Satkar: सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देणारे व्यक्तीमत्व म्हणजे जालिंदर बोरुडे होय-शिवाजीराव...

Sevapurti Satkar: सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देणारे व्यक्तीमत्व म्हणजे जालिंदर बोरुडे होय-शिवाजीराव कर्डिले

Sevapurti Satkar: मान्यवरांच्या उपस्थितीत जालिंदर बोरुडे यांची सेवापुर्ती

Sevapurti Satkar: अहमदनगर (प्रतिनिधी) – पाटबंधारे विभागातील कर्मचारी जालिंदर बोरुडे यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे दीर्घकाल सेवा बजावून एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. आपल्या सेवा कार्यात अनेक अधिकारी, कर्मचारी यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवत शासकीय कामकाजा मोठे योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे विभागातील कर्मचार्‍यांच्या प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातूनही लढा देत ते सोडविले आहेत. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

त्याचबरोबर फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेले आरोग्य क्षेत्रातील कार्य अद्वितीय असेच आहे. नोकरी बरोबरच सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देणारे जालिंदर बोरुडे हे आज सेवानिवृत्त होत असले तरी त्यांना समाजासेवेचा पिंड कायम राहणार आहे. त्यांचे कार्य आज इतके व्यापक झाले आहे की ते त्यांना स्वस्थ बसू देणार नाही. अशा समाजसेवेचा वसा घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या पुढील कार्यास आमच्या नेहमीच शुभेच्छा राहतील, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

जालिंदर बोरुडे यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सत्कार

पाटबंधारे विभागातील कर्मचारी जालिंदर बोरुडे यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आ.संग्राम जगताप, भाजपाचे प्रदेश कार्य.सदस्य अ‍ॅड.अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, जि.प.सदस्य शरद झोडगे, उद्योजक जनक आहुजा, भिंगार बँकेचे चेअरमन अनिल झोडगे, कवी चंद्रकांत पालवे, अण्णा चौधरी, नगरसेवक धनंजय जाधव, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक बाळासाहेब पवार, संजय चोपडा, योगीराज गाडे आदि मान्यवर उपस्थित होते.

जालिंदर बोरुडे यांच्या आयुष्यात आलेल्या संकटांनंतर परमेश्वराच्या अस्तित्वाबाबतच मनात प्रश्नचिन्ह

श्री.कर्डिले पुढे म्हणाले, जालिंदर बोरुडे यांच्या आयुष्यात आलेल्या संकटांनंतर परमेश्वराच्या अस्तित्वाबाबतच मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समाजासाठी झटणार्‍याच्या आयुष्यात परमेश्वराने संकटे कसे आणू शकतो. मी एकदा त्यांना समाजसेवा थांबविण्याचा सल्लाही दिला होता. मात्र त्यांनी समाजसेवा सोडणार नसल्याचे निश्चय व्यक्त केला. त्यांनी त्यांच्या शासकीय नोकरीचा पहिल्या पगारापासून समाजसेवेला सुरुवात केले. पगारातील निम्मे पैसे ते समाजसेवेसाठी खर्च करतात. हे कार्य गेल्या 40 वर्षांपासून सुरु आहे. त्यांची शासकीय सेवेतील सेवापुर्ती सोहळा म्हणजे त्यांच्या समाजसेवेसाठी आनंद सोहळा आहे, कारण आता त्यांना समाजसेवेसाठी पुर्णवेळ मिळेल, असे सांगितले.

आज प्रत्येक व्यक्ती हा स्व:कार झाला: पद्मश्री पोपटराव पवार

याप्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, आज प्रत्येक व्यक्ती हा स्व:कार झाला आहे. त्यात सरकारी नोकर म्हणलं की विचारुन नका, गाडी, बंगला, प्रतिष्ठा यासाठी प्रत्येक व्यक्ती झटत असतो, परंतु जालिंदर बोरुडे यांनी आपली नोकरी प्रामाणिकपणे केलीच पण सामाजिक दायित्व जपत सहकारी कर्मचारी, अधिकारी यांच्याही मदतीसाठी नेहमीच हात पुढे केला. समाजसेवेचा वसा कायम जपणार्‍या कार्यकर्ता म्हणून आज त्यांचे कार्य सर्वदूर पोहचले आहे. निवृत्तीनंतरही हे कार्य अधिक व्यापक होईल, यात शंका नाही, असे सांगितले.

जालिंदर बोरुडे यांच्या कार्याचे कौतुक

याप्रसंगी आ.संग्राम जगताप, अभय आगरकर, भगवान फुलसौंदर, शरद झोडगे आदिंनीही जालिंदर बोरुडे यांच्या कार्याचे कौतुक करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर आभार अमित धाडगे यांनी मानले. यावेळी भिमराज रासकर, रमेश भोजने, शामराव व्यवहारे, अर्जुनराव बोरुडे, शिवाजीराव बनकर, बाबासाहेब धिवर, राजेंद्र बोरुडे, संजय ताजणे, मोहन कुर्‍हे, दिलीप गायकवाड, रतन तुपविहिरे, अनिल बनसोडे, किरण रासकर, राहुल भोजने, पोपट धाडगे, पांडूरंग धाडगे, गंगाराम धाडगे, मंगेश दरवडे, गौरव बोरुडे, दादू उमाप, अशोक भुजबळ, विष्णू फुलसौंदर, राहुल बोरुडे, सौरभ बोरुडे आदिंसह पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरदेवळे पंचक्रोशितील ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments