
Shevgaon News: शेवगाव (प्रतिनिधी): शेवगाव तालुक्यातील जि.प. केंद्रशाळा चापडगाव येथे धावपळीच्या काळात आजी आजोबा दिनानिमित्त विशेष आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.असल्याची माहिती शिक्षक, कवी गबाजी बळीद यांनी दिली.
प्रारंभी सर्व आजी,आजोबांची शाळेच्या प्रवेशद्वारापासून मंचापर्यंत विद्यार्थी व शिक्षकांनी सवाद्य मिरवणूक काढून विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळात बालकांच्या प्रेमाला पारखे होत असलेल्या लाड पुरवणाऱ्या संस्कारक्षम आजी आजोबांशी लाडीक सचेतन नातवांची नाळ अधिक घट्ट करून दिली .असे सांगून संयोजक कवी बळीद यांनी सर्वांचे स्वागत केले.
आपल्या मायाळू आजी, आजोबांची शाळेत उपस्थिती पाहून बालकांच्या निरागस चेहऱ्यावरील आनंद झऱ्यांप्रमाणे ओसंडून वाहत होता. क्षणभर आजी, आजोबांही नातवंडाच्या घोळक्यात स्वतःला हरवून गेले.
आधुनिक भारतीय शिक्षणाचे शिल्पकार थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन चापडगावच्या नवनिर्वाचित सरपंच मा.सौ.विठाताई हरिश्चंद्र नेमाने यांच्या हस्ते तर आजी, आजोबा मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. कल्याणराव नेमाने, ग्रामपंचायत सदस्या सौ. मंगलाताई आण्णासाहेब गोरे, श्री राजाराम गायकवाड,महेश नेमाने, भारतभाऊ पातकळ, शहादेव गोरे, हरिभाऊ दिवटे, शिवाजी पातकळ, शिवनाथ मडके,हरिश्चंद्र नेमाने आदि मान्यवर आजी आजोबांच्या उपस्थितीत करण्यात आले.
आजच्या धकाधकीच्या वातावरणात आई, वडिलांनंतर कुटुंबाचा संस्कारी आधार म्हणजे आजी, आजोबा आजी, आजोबांची महती सांगणारा ” जुळो मधुबंध ” या स्वरचित अभंगाचे गायन करून शिक्षक कवी गबाजी बळीद यांनी उपस्थितांची मने जिंकली.आजी, आजोबा दिनाचे औचित्य साधून आजी, आजोबांसाठी संगीत खुर्ची , चमचा लिंबू, गीत गायन, अभंग गायन, गौळण गायन, अनुभव कथन आदी मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले .
कार्याक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री तुकाराम भगतसर यांनी तर सर्वांच श्री गवाजी बळीदसर यांनीपाहुण्यांची ओळख करून दिली. अध्यक्षीय निवड श्रीमती अलका साळवे मॅडम यांनी तर अनुमोदन श्री संजय गीतखणेसर यांनी दिले. या प्रसंगी शाळेच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच सौ विठाताई नेमाने व शाळेचे हितचिंतक मा. कल्याणराव नेमाने यांचा सत्कार करण्यात आला.
मनोरंजक संगीत खुर्चीच्या खेळाचे नियोजन श्री नीलकंठ आमलेसर यांनी तर परीक्षण श्रीमती वर्षाताई कांबळे मॅडम व श्रीमती सुनीताताई रोडे यांनी केले. मनोरंजक संगीत खूर्चीच्या खेळात पुरुष गटात श्री शहादेव गोरे विजेते तर सुधाकर वैरागर उपविजेते ठरले . संगीत खुर्चीच्या खेळात महिला गटात सौ. जनाबाई जाधव विजेत्या तर सौ .जयाताई भंडारी उपविजेत्या ठरल्या .चमचा लिंबू खेळाचे आयोजन श्री संजय गीतखणे सर यांनी केले तर परीक्षण श्रीम . सिंधुताई गमे यांनी केले .
या खेळात सौ.लताताई जाधव विजेत्या तर सौ .जयाताई भंडारी उपविजेत्या ठरल्या . खेळात रममाण झालेले आजी आजोबा आपले वय विसरून बालपणात रमलेले पाहून नातवंडे टाळ्यांच्या वर्षावात भारतमाता की जय घोषणा करून त्यांना प्रेरणा देत सहभागी झाले.
सदर कार्यक्रमात रस्ता सुरक्षा संदर्भात एसटी महामंडळातील निवृत्त चालक श्री हरिश्चंद्र नेमाने यांनी बहुमोल मार्गदर्शन करून बालमित्रांचे प्रबोधन केले व महत्वाच्या सूचना देऊन रस्त्यावरून जातांना अपघात टाळण्यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले.
शालेय विद्यार्थी सना शेख, रुकय्या शेख, सबा शेख, शिवराज गोरे, महेश दिवटे, चैतन्य कोठूळे, शौर्य नवले यांनीही आपल्या आजी आजोबांची महती आपल्या मनोगतातून व्यक्त केली . मुख्याध्यापक श्री तुकाराम भगतसर यांनी कलियुगात झालेला बदल आपल्या मनोरंजक वाणीतून सादर केला तर आजी सौ मुक्ताबाई कोठुळे यांनी तुकोबारायांचा अभंग आपल्या सुरेल आवाजात सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
सदर मेळाव्यास श्री सुरेश वाल्हेकर, विष्णू जगताप, गोपीनाथ पातकळ, श्रीकिसन पातकळ, रंगनाथ गोरे, बबनराव जाधव, भाऊराव पातकळ, किसन तेलोरे, दगडू गटकळ, रामा तेलोरे, आण्णासाहेब गोरे, महेश नेमाने, राजाराम गायकवाड, दशरथ शिंदे, भारत भाऊ पातकळ, शिवाजीराव पात कळ, शिवनाथ मडके, बाबासाहेब पातकळ, हरिश्चंद्र नेमाने, सुधाकर वैरागर , विठ्ठल दिवटे, कल्याणराव पातकळ सौ.मुक्ताबाई कोठुळे, भागिरथी पातकळ, कमल पातकळ, जनाबाई जाधव , सुभद्रा मडके ,
सविता दळे, सुशिला वाल्हेकर, सुमन वाल्हेकर, लक्ष्मीबाई निर्मळ, रेखाताई काते,रूक्मिणी शिदे, मंडाबाई कुटे, साखरताई भुसे, जयाताई भंडारी, सायराबी शेख, सीताबाई बीडे, सिंधुताई पातकळ, रुक्मिणीताई दिवटे, उषाताई शिंदे लताबाईजाधव, शांताबाई जाधव, सिताताई शेंबडे ,
द्वारकाताई वैद्य, नंदाताई तेलोरे, नंदाताई मते, विजयाताई पातकळ, बेबीताई शेख, मथुराबाई जाधव, इंदुताई बीडे, सरस्वती दातार, शांताबाई नेमाने, मंगलाताई गोरे, विठाताई नेमाने, शारदाताई निकाळजे, शोभाताई मडके आदि मान्यवरांनी मनोरंजक खेळात सहभागी होऊन आनंददायी मेळाव्याचे व शाळेच्या सर्व शिक्षक वृंदांचे भरभरून कौतुक केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तुकाराम भगत सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री संजय गीतखणे सर यांनी केले.