Monday, October 2, 2023
HomeAHMEDNAGARShikshak Parishad: स्थानिक पातळीवरील प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावे- प्राचार्य सुनिल पंडित

Shikshak Parishad: स्थानिक पातळीवरील प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावे- प्राचार्य सुनिल पंडित

Shikshak Parishad: स्थानिक पातळीवरील प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावे- प्राचार्य सुनिल पंडित

Shikshak Parishad: राज्य शिक्षक परिषदेची नाशिक विभागीय कार्यकारीणी जाहीर

     Shikshak Parishad: नाशिक – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची नाशिक विभागाची बैठक  राज्य अध्यक्ष सुनील पंडीत यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  यावेळी  राज्य कार्याध्यक्ष म्हणून निवड झालेले डी.यु.अहिरे, माजी आ.भगवानराव साळुंके, प्रांत सदस्य  सुमनताई हिरे उपस्थित होते. 

विभाग पदाधिकार्‍यांच्या निवडीनंतर जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी निवडीचे नियोजन

     महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषेचे राज्यअध्यक्ष सुनिल पंडीत यांनी राज्यभर दौरे करून संघटनात्मक बांधणीचा धडाका लावलेला आहे.  यामध्ये शिक्षक परिषदेची पुणे येथे संपन्न झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या सभेत  राज्य कार्यवाहपदी राजकुमार बोनकिले (अमरावती), कोषाध्यक्षपदी राजेंद्र सुर्यवंशी (कोल्हापूर), संघटनेचे नाशिक विभागाचे सचिव डी.यु.अहिरे यांची राज्य कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याचबरोबर माजी आमदार नागो गाणार, भगवानराव साळुंके, माजी राज्यअध्यक्ष वेणूनाथ कडू यांचीही कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. विभाग पदाधिकार्‍यांच्या निवडीनंतर जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी निवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

Shikshak Parishad: संघटन मंत्री सखाराम गारुडकर, (अहमदनगर) यांची एकमताने निवड

     राज्य अध्यक्ष सुनिल पंडीत व कार्याध्यक्ष डी. यु. अहिरे यांनी बैठकाच धडाकाच लावलेला असून पुढील टप्प्यात विभागीय कार्यकारीणी निवडीचे सत्र सध्या सुरु झालेले आहे. नाशिक विभागीय बैठकीत नाशिक विभागीय कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यामध्ये शरद दळवी (अहमदनगर) नाशिक विभाग अध्यक्ष, विभाग कार्यवाह सचिन पाटील (नाशिक), कोषाध्यक्ष सुनील मोरे (धुळे), उपाध्यक्ष शंकर सांगळे (नाशिक), अरुण पाटील, (मालेगाव), कार्याध्यक्ष नरेंद्र ठाकरे (नाशिक), संघटन मंत्री सखाराम गारुडकर, (अहमदनगर) यांची एकमताने निवड करण्यात आली.

     विभागीय निवडीनंतर संघटनात्मक बांधणीवर व विस्तारावर सविस्तर चर्चा करण्यात आली व नूतन सदस्य वाढविणे, नवीन कार्यकर्त्यांना संघटनेत पदावर संधी देणे याबाबत निर्णय घेण्यात आले. विभाग व जिल्हा शिक्षण विभागाचे अधिकारी यांचे समवेत संघटनेची बैठक लावून स्थानिक पातळीवरील प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले असल्याचे प्राचार्य सुनिल पंडित यांनी सांगितले.

सेवाहमी कायद्याची अंमलबजावणी होणेबाबत पाठपुरावा

     तसेच शिक्षक शिक्षकेतरांना जुनी पेन्शन योजना लागू होणेबाबत शासन समितीचा अहवाल 15 जून पूर्वी सादर केला जाण्यासाठी आग्रह धरणे व जुनी पेन्शन योजना लागू होणेबाबत अंमलबजावणी करणे.  कॅशलेस मेडीक्लेम योजना सर्वांसाठी लागू करणे. सर्व जिल्ह्यामधील शिक्षक शिक्षकेतरांचे वेतन शासन निर्देशानुसार एक तारखेला होणे.  थकीत पुरवणी देयकाबाबत निधी मिळणेबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करणे. शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार सेवाहमी कायद्याची अंमलबजावणी शिक्षण विभागाच्याच कार्यालयात होणेबाबत पाठपुरावा करणे.  या व अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

     शिक्षण विभागाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित कार्यालयासमोर. धरणे आंदोलन, उपोषण, धडक मोर्चाचे नियोजन करण्याचे निश्चित झाले. यावेळी  मिरजच्या सिनेट सदस्या सुनिता कुलकर्णी, नाशिक जिल्हाचे संजय पवार , संजय पाटील. विनोद हिरे, तुकाराम मांडवडे ग्रंथालय विभागाचे राज्य अध्यक्ष विलास सोनार आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments