Monday, September 25, 2023
HomeAHMEDNAGARShivsena: पी.एम किसान योजनेचे पैसे मिळत नसल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Shivsena: पी.एम किसान योजनेचे पैसे मिळत नसल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Shivsena: पी.एम किसान योजनेचे पैसे मिळत नसल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Shivsena: शिवसेनेच्यावतीने पी.एम किसान योजनेचे पैसे मिळत नसल्याबद्दल जिल्हाधिकारीना निवेदन

Shivsena: अहमदनगर (प्रतिनिधी)- पी.एम किसान जनधन योजनेनुसार ४ महिन्यांनी शेतकऱ्यांना रु.२००० मिळत होते.पण गेले ९ से १० महिन्यापासून हे पैसे मिळत नाही.तसेच संजय गांधी निराधार योजनेचे पण ४ ते ५ महिने झाले निराधार महिलांना व विधवा लाभार्थायांना बँक खात्यात रुपये जमा होत नाही.याची चौकशी करून ती मिळवून द्यावी अशा मागणीचे निवेदन आज शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले यावेळी उपतालुका प्रमुख नगर अंबादास कल्हापुरे,डॉ करण गाडे,अर्जुनमामा कारले रावसाहेब गोंडाळ,बबनराव कर्डिले,दत्ता गावखरे, पोपट खरपुडे,विलास कोठुळे आदींसह शिंदे गटाचे शिवसैनिक उपस्तिथ होते

निवेदनात म्हटले आहे कि नगर जिल्हा दुष्काळ भाग आहे.या मदतीमुळे त्यांना हातभार लागत होता पण आता ते यापासून वंचित आहे. मशागतीसाठी या पैशाचा उपयोग झाला असता,तसेच पाऊस नसल्याने पेरणीला दोन महिने उशिरा झाला आहे.शेतकरी रोज जनधन योजनेचा लाभ झालेला आहे कि नाही ते पाहण्यासाठी बँकामध्ये चकरा मारत आहे.सध्या शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.तरी आपण योग्य ती कार्यवाही करून पैसे मिळवून द्यावे हि विनंती.या योजनेपासून शेतकरी वंचित राहिल्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी वरील अधिकारी व प्रशासनाने हा प्रश्न सोडवावा असे निवेदनात म्हटले आहे.

यावर संबंधीत किसान योजनेचे अधिकारी व कर्मचारी याना निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील याना बोलवून घेतले व प्रश्न त्वरित मार्गी लावण्यासाठी सांगितले ते म्हणाले हि केंद्र शासनाची योजना आहे पी.एम. किसान ही १०० टक्के केंद्र शासनाची योजना असून या योजनेस भारत सरकारचे १००% अर्थसहाय्य आहे,

या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रती वर्ष रू. ६००० उत्पन्न पाठबळ म्हणून लाभ देण्यात येत आहे,या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती, पत्नी व त्यांची अल्पवयीन(१८ वर्षाखालील) मुले अशी आहे,राज्य शासन अशा शेतकरी कुटुंबांची ओळख/पडताळणी करतील जे या योजनेंतर्गत विहित निकषांप्रमाणे पात्र असतील,या योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे करण्यात येत आहे परंतु अनेक जण यामध्ये अपात्र ठरले आहे.

Shivsena: अनेक कारणामुळे शेतकरी अपात्र ठरले

यामध्ये अनेक कारणामुळे शेतकरी अपात्र ठरले आहे खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत यामध्ये सर्व संस्थात्मक जमीनधारक,अशी शेतकरी कुटूंब जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहेत-आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/ माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परीषद सदस्य,आजी/माजी महानगरपालीकेचे महापौर,आजी/माजी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष,

केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयामधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमीत अधिकारी/कर्मचारी,चतुर्थश्रेणी/गट ड वर्ग कर्मचारी वगळून,सर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रु.१०,००० किंवा त्यापेक्षा जास्त आहे

चतुर्थश्रेणी-गट ड वर्ग कर्मचारी वगळून,मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती,नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर,वकील, अभियंता, सनदी लेखापाल(C.A),वास्तुशास्त्र, इ.क्षेत्रातील व्यक्ती याशिवाय आधारकार्ड लिंक नसणे,बँकेत केवायसी नसणे,बँक खाते ब्लॉक असणे आदी अनेक कारणे आहेत.

ज्यांना या योजेनचा सध्या लाभ होत नाही त्यांनी माझ्या ऑफिसशी संपर्क साधावा

यावेळी शेळके म्हणाले कि ज्यांना या योजेनचा सध्या लाभ होत नाही त्यांनी माझ्या ऑफिसशी संपर्क साधावा त्यांच्या ज्या कारणामुळे ते पात्र असूनही त्यांना अपात्र ठरवले गेले त्याचा पाठपुरावा करण्यात येईल त्यासाठी जिल्हातील पात्र असून अपात्र ठरलेल्या किंवा गेली अनेक महिने मिळत नसलेल्या शेतकऱ्यांनी पुढील ठिकाणी संपर्क साधावा येताना आधार कार्डची झेरॉक्स घेऊन यावे आनंदराव शेळके,जिल्हा उपप्रमुख,नगर दक्षिण कार्यालय,माळीवाडा बसस्टॅन्ड समोर, अंबर प्लाझा बिल्डिंग,लोकसेवा सहकारी पतसंस्था शेजारी, नगर मो ९९२२६६३५६६/७०२०५८२२१८ वर संपर्क साधावा निवेदनाच्या प्रति ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,महाराष्ट्र राज्य,महसूलमंत्री ना राधाकृष्णजी विखे पाटील यांनाही पाठवण्यात आल्या आहेत

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments