Monday, October 2, 2023
HomeAHMEDNAGARTeachers Day Bhingar: ओंकार कम्प्युटरचेवतीने शिक्षक दिनी भिंगार मधील शिक्षकांचा सन्मान

Teachers Day Bhingar: ओंकार कम्प्युटरचेवतीने शिक्षक दिनी भिंगार मधील शिक्षकांचा सन्मान

Teachers Day Bhingar: ओंकार कम्प्युटरचेवतीने शिक्षक दिनी भिंगार मधील शिक्षकांचा सन्मान

Teachers Day Bhingar: शिक्षक हेच भावी पिढीचे शिल्पकार – अभिजित भूतकर

Teachers Day Bhingar: अहमदनगर (प्रतिनिधी): शिक्षक हेच भावी पिढीचे शिल्पकार आहेत. शिक्षण हाच खरा विकासाचा मंत्र आहे. शिक्षक हेच समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. यामध्ये शिक्षकांची भूमिका फार मोलाची आहे. ज्याप्रमाणे माळी झाडांची काटछाट करून त्याला सुंदर बनवतो. त्याचप्रमाणे शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांचे दुर्गुण दूर करून त्यांच्यात सदगुणांचा विकास घडवून आणतात असे प्रतिपादन ओमकार कॉम्प्युटरचे संचालक अभिजीत भुतकर यांनी केले.

      भिंगार येथील ओंकार कॉम्पुटर च्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्त साधुन भिंगार हायस्कुल, रयत शिक्षण संस्था, प्रियदर्शनी स्कुल व कॅनटोनमेंट स्कुल येथील शिक्षकांचे सत्कार करण्यात आले. यावेळी अभिजित भूतकर बोलत होते. याप्रसंगी यावेळी शितल भुतकर व इन्स्टिट्यूटचे सदस्य आदी उपस्थित होते.

      पुढे बोलताना भूतकर म्हणाले की, शिक्षकांचे प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असते. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असते. त्यांचा शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान होणे गरजेचे असते त्यामुळेच ओंकार कॉम्प्युटरचे वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

     ओंकार कॉम्प्युटरच्या वतीने भिंगार मधील सर्व शाळेमध्ये जाऊन तेथील मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रियदर्शनी स्कूलमध्ये प्राचार्य अंजली बोधक, कॅन्टोन्मेंट  स्कूल भिंगार येथील प्राचार्य संजय शिंदे,

 रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य नरवडे सर, भिंगार हायस्कूलचे प्राचार्य कासार सर, या सर्वांचा  संस्थेच्या वतीने फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला .

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments