
Teachers Nivedan | निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन- शिक्षक नेते सुनिल गाडगे
Teachers Nivedan | अहमदनगर (प्रतिनिधी): राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये कंत्राटदार बाह्यसंस्थेच्या माध्यमातून शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत, त्याविरोधात शिक्षक-शिक्षकेतर संताप व्यक्त करत आहेत.राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
असे असताना सरकारच्या उद्योग विभागाने जीआर काढून राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे कांत्रदाराकडून भरण्याची सक्ती स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध प्रकारच्या आस्थापनांवर केली आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेसोबत इतर सरकारी आणि अनुदानित शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्याविरोधात गेल्या आहेत. शिक्षक भारती संघटनेने सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतले आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून शिक्षक भारतीच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी राजेश कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला आहे. सरकारी-निमसरकारी नोकऱ्यांच्या खासगीकरणाच्या सरकारच्या निर्णयामुळे कर्मचा-यांचे भवितव्य उद्ध्वस्त करून त्यांना अंधारात लोटणार आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या स्वप्नांची राख करणारा हा निर्णय आहे.
कंत्राटी कर्मचा -यांचे अनिर्बंध शोषण करणारा, समानतेच्या व सामाजिक न्यायाच्या तत्वाला हरताळ फासणारा हा निर्णय आहे, असे सुनील गाडगे यांनी म्हटले आहे. खासगीकरणाचा हा धोका वेळीच आवरला पाहिजे. त्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकातून या निर्णयाला कडाडून विरोध केला पाहिजे. म्हणून आज आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, असेही सुनील गाडगे यांनी सांगितले.
शिक्षक भारतीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांनी सरकारी शाळा,शिक्षकांची पदे वाचविण्यासाठी सर्वांनी लढा देऊन त्यात उतरायला हवे, असे आवाहन केले. सरकार शिक्षकांना वाऱ्यावर सोडून तरुणांच्या हक्काच्या नोकऱ्या कंत्राटदार कंपन्यांना देत आहे.
दुसरीकडे सरकारी शाळा कॉर्पोरेट कंपन्यांना दत्तक देणार असल्याने सर्व शिक्षण व्यवस्था उदश्वस्त होणार असल्याने त्या विरोधात सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र लढा द्यावा, असे आवाहन जगताप यांनी केले. यावेळी उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे. सचिव महेश पाडेकर . कार्याध्यक्ष प्रा.डॉ. किशोर डोंगरे. सचिन लगड . संभाजी पवार. रामदास काळे. संतोष नलगे. आर डी साबळे. एस एम दिंडे. शिंदे सर. आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.