
Tree Plantation: अहमदनगर (प्रतिनिधी): शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी धोत्रे येथील विद्यार्थ्यांनी कॉलेज परिसर हिरवागार ठेवण्यासाठी वृक्षारोपणाचे कार्य हाती घेतले.आपले पर्यावरणासाठी झाडे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महाविद्यालयांमध्ये पर्यावरण जागृती अभियान सुरू आहे.त्याच प्रक्रियेमध्ये महाविद्यालयात झाडे लावली गेली.
वृक्षांची संख्या जितकी जास्त होईल, तितकीच हिरवळ वाढेल आणि पर्यावरण प्रदूषण मुक्त होईल असे पदवीका महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्राध्यापक प्रियंका साबळे यांनी सांगितले.
महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी या वृक्षारोपण कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
वृक्षारोपण कार्यक्रमास प्रा.सुयोग देवढे,प्रा.अदिती लाटे,प्रा.अश्विनी ढवळे, प्रा. अबोली देशमाने, प्रा. राजू डहाळे,प्रा.विकास पळसकर, प्राची दहातोंडे, पूनम पळसकर, अविनाश भांड आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रशांत शिंदे सर सचिव सौं सोनाली शिंदे मॅडम तसेच डॉ. के बाली रेड्डी यांनी केले.