Monday, September 25, 2023
HomeINDIATushar Gandhi: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी भिडे यांच्यासह पोलीस निरीक्षक...

Tushar Gandhi: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी भिडे यांच्यासह पोलीस निरीक्षक तसेच पुणे पोलीस आयुक्त यांच्या विरोधात न्यायालयात केली तक्रार दाखल

Tushar Gandhi: पुणे : महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी (Tushar gandhi) हे आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे अध्यक्ष मनोहर उर्फ संभाजी भिडे (sambhaji bhide) यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये तक्रार दाखल आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले यांसह इतर काही महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांचा अवमान केला होता.

यासंदर्भात तुषार गांधी यांनी याआधी पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र त्या तक्रारीवर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे ते आज संभाजी भिडे यांच्यासह डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्या विरोधात शिवाजीनगर न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. वकील असीम सरोदे यांच्या मदतीने ही तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अन्वर राजन, मेधा पुरव सामंत हे देखील तुषार गांधी यांच्यासोबत आहेत.

यापूर्वी 10 ऑगस्टला तुषार गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महिना उलटून गेला तरीही योग्य कारवाई करण्यात आली नाही. त्यावेळी योग्य शाहनिशा करुन कारवाई करणार असल्याचं डेक्कन पोलिसांनी सांगितलं होतंं. मात्र महिना उलटून गेल्यानंतर कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

गांधी घराण्यातील स्त्रियांचा अपमान आणि बेआब्रू केली आहे. ही गांधी घराण्यातील सगळ्याच पिढ्यांची बेआब्रू आहे. त्यामुळे बेआब्रू करणे, महिलांचा अपमान करणे, लोकांच्या मनात अनेक गोष्टींबाबत भेदभाव निर्माण करणे, गुन्हेगारी स्वरुपाचा वक्तव्य करणे आणि संगनमताने अशाप्रकारे कृत्य करणे त्यासोबतच समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य या सगळ्या कलमांअंर्तगत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रार नोंदवण्यात आली आहे, असं सरकारी वकील असिम सरोदे यांनी 10 ऑगस्टला तक्रार दाखल केल्यानंतर म्हटलं होतं.

एखाद्या ठिकाणी भाषण करायचं आणि त्याची चित्रफित करुन समाज माध्यमांवर टाकायचं. करोडो लोकांनी ही चित्रफित बघितली आहे ऐकली आहे, त्यामुळे संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा अशा स्वरुपाची तक्रार डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. मात्र त्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत थेट शिवाजी नगर न्यायालयात तक्रार दाखल करायचं ठरवलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments